| मल्टिब्रँडमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळत एफडीआयसमोरील सर्व अडथळे सुप्रीम कोर्टाने दूर केले. ग्राहक हा राजा आहे, हे जर धोरण यामागे असेल, तर त्यात चुकीचे काय, असा सवाल करत कोर्टाने केंद्र सरकारला दिलासा दिला आहे.मधल्या दलालांना दूर सारणे, हेच यामागचे धोरण आहे. दलाली हा भारतीय अर्थव्यवस्थेला शाप आहे आणि त्यामुळे अर... |